शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

नानुभाऊच्या चहाने घातली उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:00 AM

मंत्री सामंत गडचिरोलीतील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून गुरूवारी नागपूरच्या दिशेने निघाले होते. आरमोरीतील नवीन बसस्थानकजवळील फूटपाथवर असलेला ‘सुंदर चहा’चा बोर्ड त्यांना दिसला आणि त्यांना चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, त्या चहा टपरीसमोर गाडी थांबवायला सांगितले. मंत्र्यांच्या व्हीआयपी गाडीसह सर्व ताफा इथे का थांबला, असा प्रश्न नानूभाऊसह तिथे उपस्थित सर्वांनाच पडला. पण मंत्री चक्क आपल्या कँटिनवर चहा पिण्यासाठी थांबले म्हटल्यावर नानूभाऊही हरखून गेला.

ठळक मुद्देताफा थांबवला : टपरीवर उभे राहून घेतला आस्वाद

महेंद्र रामटेकेलाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सायरन वाजवत मंत्री महोदयांच्या वाहनांचा ताफा येत होता. अचानक वाहनांची चाके मंदावतात  आणि सर्वांची धावपळ होते. मंत्री महाेदय व्हीयआयपी गाडीतून खाली उतरतात आणि चक्क चहा पिण्यासाठी टपरीसमोर उभे राहतात.  विश्वासच  बसणार नाही, असा हा देखावा आरमोरीकरांनी पाहिला. चहा घेणारे ते मंत्री होते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि त्यांना गरमागरम चहा पाजणारा होता नानूभाऊ अर्थात ज्ञानेश्वर रामदास ढोरे.मंत्री सामंत गडचिरोलीतील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून गुरूवारी नागपूरच्या दिशेने निघाले होते. आरमोरीतील नवीन बसस्थानकजवळील फूटपाथवर असलेला ‘सुंदर चहा’चा बोर्ड त्यांना दिसला आणि त्यांना चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, त्या चहा टपरीसमोर गाडी थांबवायला सांगितले. मंत्र्यांच्या व्हीआयपी गाडीसह सर्व ताफा इथे का थांबला, असा प्रश्न नानूभाऊसह तिथे उपस्थित सर्वांनाच पडला. पण मंत्री चक्क आपल्या कँटिनवर चहा पिण्यासाठी थांबले म्हटल्यावर नानूभाऊही हरखून गेला. चहा तयार हाेईपर्यंत जवळपास १५ ते २० मिनिटे ते कँटिनसमोर उभे होते. ज्ञानेश्वरने बनवलेला चहा पिऊन मंत्री सामंत खुश झाले. चहाचे कौतुक करत त्याच्यासोबत फोटोही काढले. सामंत यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील जवळपास ४० लोकांनी ज्ञानेश्वरने बनवलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. यावेळी आरमोरी येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूरही उपस्थित होते. एखादा मंत्री लहानशा चहा टपरीवर थांबून चहा पित असल्याचे दृष्य अभावानेच पाहायला मिळते. ‘आबा’ अर्थात आर. आर. पाटील यांच्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी हा अनुभव गडचिरोलीकरांना दिला. आरमोरीजवळच्या अरसोडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर  रामदास ढोरे हा सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरीच्या मागे न लागता, आरमोरीजवळील नवीन बसस्थानकाजवळ २०१५पासून चहाची टपरी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. त्याच्या कॅन्टीनवर मंत्री चहा पिऊन गेल्याची चर्चा तालुकाभर पसरत आहे. त्यामुळे सध्या ताे चर्चेचा विषय झाला आहे.

ट्वीटमधूनही केले कौतुक ज्ञानेश्वर ढोरे यांच्या या चहाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरूनही कौतुक केले. या ट्विटमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरसोबत काढलेले  तीन फोटोही शेअर केले आहेत. यामुळे आरमोरीतील या चहाची महती सर्वत्र पसरली.

मंत्रालयातून फाेनद्वारे विचारपूससामंत यांचा ताफा गेल्यानंतर मुंबई येथील मंत्रालयातील सामंत यांच्या कार्यालयातून ज्ञानेश्वर यांना फोन आला आणि त्यांची विचारपूस करण्यात आली, अशी माहिती ज्ञानेश्वरने ‘लोकमत’ला दिली. यामुळे चहावाल्या ज्ञानेश्वरचे राजकारणात नशीब फळफळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

टॅग्स :ministerमंत्री