या वेबिनारचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनवर्सन तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री राजेंद्र पाल सिंग, सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. ईश्वरैया, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष डॉ.के. लक्ष्मण, माजी मंत्री महादेव जानकर, हरियाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, इंदरजीत सिंग, अमेरिकेतून डॉ.हरी इपण्णापेल्ली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ.अशोक जीवतोडे उपस्थित राहणार आहे. यावेळी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.सुधांशु कुमार, ऑल इंडिया ओबीसी फेडरेशनचे सचिव जी.करूणानिधी, कालिंदी महाविद्यालयाच्या सहायक प्रा.डॉ.सीमा माथूर या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे. या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वेबिनारला मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव तथा कार्यक्रम समन्वयक सचिन राजुरकर व उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ऑनलाइन वेबिनार आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:36 AM