लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भामरागड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम आणि बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केले. पर्लकोटा नदीवरून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारविरोधी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.पर्लकोटा नदीवरील रेती घाटाचा लिलाव करावा, वन जमिनीचे पट्टे मंजूर करावे, नद्यांवर मोठे पूल बांधावे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करावे, भामरागडातील नळ योजना सुरू करावी, प्रत्येक गावांमध्ये विद्युतीकरण करावे, रिक्त पदे भरावी, कनिष्ठ व फौजदारी न्यायालय सुरू करावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.मोर्चात जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, हर्षवर्धनबाबा आत्राम, न.प.उपाध्यक्ष शारदा कंबागोनिवार, आदिवासी सेवक सबरबेग मोगल, सभापती हरी रापेल्लीवार, इंदरशहा मडावी, श्रीकांत मोडक, भारती इश्टाम, वसंती मडावी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भामरागड तहसीलवर राष्ट्रवादी काँंग्रेसची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:24 AM
भामरागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भामरागड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पर्लकोटा नदी रेतीघाटाचा लिलाव करा; शेकडो कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग