लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : दरवर्षी उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने रानटी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार होतात. वन्यप्राण्यांचा त्रासही लोकांना होतो. ही बाब जाणून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जंगलात अनेक ठिकाणी वनतलावाचे खोदकाम मागील वर्षी करण्यात आले. सध्या या तलावांमध्ये भरपूर पाणी असल्याने जनावरांसाठी एकप्रकारची संजीवनी मिळाली आहे.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मागील वर्षी एटापल्ली तालुक्यात भामरागड वनविभागाच्या पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वनतलावाचे खोदकाम करण्यात आले. बारसेवाडा ते चंदनवेली जंगलात वनतलावांचे खोदकाम करण्यात आले. सध्या या तलावामध्ये भरपूर प्रमाणात पाणी दिसून येते. तालुक्यातील नाले, लहान नद्या मार्च महिन्यातच आटल्या. तलाव, बोड्याही कोरड्या पडल्या. या भागातील हातपंप व विहिरीतील जलपातळी झपाट्याने घटली आहे. तालुक्यातील जंगलात मोजक्याच प्रमाणात वनतळे होते. परंतु मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी वनतलाव खोदण्यात आले.बारसेवाडा ते चंदनवेली जंगलात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे वनतलाव दिसून येतात. या तलावामुळे जंगलातील प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय दिवसा परिसरातील पाळीव जनावरे पाणी पितात. जलपातळी वाढविण्याच्या मुख्य हेतूने निर्माण करण्यात आलेले वनतलाव या भागातील पाळीव व रानटी जनावरांना नवसंजीवनी ठरत आहेत. वनविभागाने पुन्हा अशाप्रकारच्या वनतलावाची निर्मिती तालुक्यातील जंगलात करावी, अशी मागणी होत आहे.
वनतलावांमुळे जनावरांना नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:23 AM
दरवर्षी उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने रानटी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार होतात. वन्यप्राण्यांचा त्रासही लोकांना होतो. ही बाब जाणून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जंगलात अनेक ठिकाणी वनतलावाचे खोदकाम मागील वर्षी करण्यात आले.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना : बारसेवाडा-चंदनवेली जंगलात मागील वर्षी केले खोदकाम