लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुला नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.काळ्या रंगाचे बॅनर झाडांना गोल स्वरूपात बांधण्यात आले आहे. शोषणकारी भ्रष्टाचारी शासनाचा ग्रामसभांनी विरोध केला पाहिजे, असे लिहिले आहे. परसलगोंदी ते हेडरीदरम्यान लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी बनविण्यात आलेल्या मार्गाच्या फाट्यावर बॅनर लावले आहे. गट्टा मार्गावरही बॅनर बांधले आहेत. मागील आठवड्यात आठ जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्यातच आता दुर्गम व जंगल भागात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे यापरिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर बॅनर भामरागड एरिया कमिटीने बांधले असल्याचे बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नक्षलवादी लाल रंगाचे कापडी बॅनर बांधतात. मात्र एटापल्ली मार्गावर बांधलेले बॅनर काळ्या रंगाचे असल्याचे दिसून येत आहे.
सुरजागड मार्गावर नक्षल बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:38 AM
तालुक्यातील सुरजागड पहाडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुला नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळ्या रंगाचे बॅनर झाडांना गोल स्वरूपात बांधण्यात आले आहे.
ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : सरकारचा विरोध करण्याचे आवाहन