शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 5:00 AM

विकासकामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्याप्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच ५०० काेटी रुपयांच्या रस्ते व पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतीक्षेत असलेले मेडिकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू. जिल्हा परिषद अध्यक्ष  अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील ब्रीजकम बंधारे यातून दळणवळणाला चालना मिळाल्याचे सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक सोयीसुविधा व दळणवळणाची साधने जिल्ह्यात उभी राहत असल्याचे ते म्हणाले.पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २७ कोटी रुपयांच्या कामांच्या शुभारंभासह ४६ वाहने व रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट, जलतरण तलावाचे लोकार्पण झाले. यावेळी  मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डाॅ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम उपस्थित होते.मार्गदर्शन करताना पालकमंत्री पुढे म्हणाले, विकासकामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्याप्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच ५०० काेटी रुपयांच्या रस्ते व पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतीक्षेत असलेले मेडिकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू. जिल्हा परिषद अध्यक्ष  अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील ब्रीजकम बंधारे यातून दळणवळणाला चालना मिळाल्याचे सांगितले.  पावसाळ्यात गडचिराेली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटत हाेता. मात्र ब्रिज कम बंधारा या बांधकामामुळे रहदारीची समस्या दूर हाेईल. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध हाेईल, असे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस क्रीडांगणावर नव्याने बांधण्यात आलेल्या किल्ला भिंतीचे अनावरण करण्यात आले. 

या कामांचे झाले लाेकार्पण- जिल्हा सामान्य रुग्णालयातील नव्याने स्थापन केलेल्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ केला.- २००ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे व बायोमेडीकल वेस्टेज व लाँड्रीचा शुभारंभ.- कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ. यासाठी अडीच काेटी रुपये मंजूर- नव्याने नूतनीकरण केलेला जलतरण तलावाचे उद्घाटन 

आराेग्य विभागाला मिळाल्या ३३ रुग्णवाहिका- मुख्यमंत्री निधीमधून ९ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका दवाखान्यांमध्ये ठेवल्या जाणार आहे.- सीएसआर निधीतून २४ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिका काेराेनाचे लसीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार आहेत.- जिल्हा विकास निधीतून पाेलीस विभागाला १३ वाहने देण्यात देण्यात आली आहे.- फायर ब्रिगेडची वाहनेही देण्यात आली.

गडचिरोली बदलत आहे – विजय वडेट्टीवारगडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की ‘अब गडचिरोली बदल रही है’ असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. सध्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचे मोठे पाऊल टाकत आहोत. वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पूर्ण होतील असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पद्धतीचे आधुनिक आपत्तीमध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे त्यांनीयावेळी सांगितले.

क्रीडा संकुलाच्या कामाचे मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनक्रीडा संकुलाच्या नवीन बांधकामाचे भूमिपूजन याकरीता ४४.५१ कोटींचा अंदाजपत्रक तयार केला आहे. यातील २७ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बांधकामाकरीता रुपये २४ कोटी ३१ लक्ष रुपयांचे काम सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात कार्यारंभ आदेश दिला आहे. या कामामध्ये प्रशासकीय इमारत तयार करणे, इनडोअर हॉल, बॅडमिंटन हॉल, २ सुरक्षारक्षक कक्षासोबत १ मुख्य प्रवेश द्वार, कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) बांधण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात जिल्हा क्रीडा संकुलाकरीता उपलब्ध असलेल्या जागेवर ३५ कोटी  रुपये खर्चून  प्रेक्षक गॅलरी, मुलामुलींचे वसतिगृह, जलतरण तलाव, विविध खेळांचे मैदान, अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकाम नियोजित आहे.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारEknath Shindeएकनाथ शिंदे