आॅनलाईन लोकमतगडचिरोलीनक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या केली आहे. त्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे.कमलापूर-रेपनपल्ली मार्गावर नक्षल्यांनी २ नोव्हेंबर रोजी रात्री बॅनर लावले होते. या बॅनरमध्ये २१ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रभारी पोलीस अधिकारी लवटे यांनी झिंगारामपेठा परिसरात बनावट चकमक घडवून आणली. या चकमकीत गावकऱ्यांच्या बकरी, बैल व इतर जनावरे मृत्यूमुखी पडले, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना जय सेवा समिती गडचिरोलीने कमलापूर रेपनपल्ली मार्गावर शनिवारी रात्री बॅनर बांधले असून या बॅनरमध्ये नक्षल्यांनी आजपर्यंत सुमारे ४९२ निष्पाप आदिवासी नागरिकांची हत्या केली आहे. दामरंचा, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रू दुर्गे यांची नक्षल्यांनी हत्या केली. हुमलकसा येथील लच्चा मडावी व लखान यांची सुध्दा नक्षल्यांनी हत्या केली. नक्षल्यांच्या विरोधामुळे दामरंचा ते कमलापूर मार्ग होऊ शकला नाही. त्यामुळे या परिसरातील पाच गर्भवती मातांना जीव गमवावा लागला आहे. याचे उत्तर नक्षल्यांनी द्यावे, असे आवाहन जय सेवा समितीने केले आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
नक्षल्यांनो, ४९२ आदिवासींच्या हत्यांचे उत्तर द्या; गडचिरोलीतील नागरिकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:10 AM
गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या नक्षल्यांनी कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे.
ठळक मुद्देनक्षल्यांना दिले गावकऱ्यांनी प्रत्युत्तरकमलापूर परिसरात बॅनर युद्ध