ऑनलाईन लोकमतपेरमिली : नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले. ही घटना शुक्रवारी अहेरी उपविभागांतर्गत येणाºया पेरमिली ते आलापल्ली मार्गावरील ३ किलोमीटरवर असलेल्या आरेंदा फाट्यावर घडली.या परिसरात नक्षल्यांनी ३ बॅनर लावले होते. आरेंदा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन ते बॅनर काढले आणि जाळले. यादरम्यान गावकऱ्यांनी माओवादाचा निषेध करत आपण माओवाद्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. माओवादी आपल्या भागातील विकास कामांना आडकाठी आणत आपली प्रगती होऊ देत नसल्याचे आमच्या लक्षात आल्याने पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्धार ५० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी व्यक्त केला.अनेक वर्षांपासून आपणच आदिवासी समाजातील लोकांच्या विकासासाठी झटत आहोत असे भासवून आपलाच फायदा पाहणाऱ्या आणि गरीब आदिवासी जनतेच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीत आडकाठी बनून विकासास बाधक ठरणाºया नक्षलवाद्यांच्या विरोधात आरेंदातील गावकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.नक्षली तरुणाला पिस्तुलसह अटककोरची : तालुक्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोटगूल येथील बाजारातून एका नक्षली तरुणास अटक करण्यात आली. चंदू उर्फ बारीक दालसू हिचामी (२१) रा.मलीनगट्टा, ता. एटापल्ली असे त्याचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता चंदू हिचामी बाजारात आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळून एक पिस्तुल व रिमोट जप्त करण्यात आले.
गावकऱ्यांनी जाळले नक्षली बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:29 AM
नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले.
ठळक मुद्देमाओवादाचा निषेध : ‘बंदी छोटो सप्ताह’ पाळण्याचे आवाहन झुगारले