शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

छत्तीसगड सीमेवर चकमकीत नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:58 PM

छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान घडली.

ठळक मुद्देदोन बंदुकांसह साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान घडली. मृत नक्षलवाद्याची ओळख अद्याप पटली नसली तरी तो जहाल नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले.गडचिरोली पोलीस कोपर्शी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. शोधमोहिमेदरम्यान शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या गोळीने मरण पावलेल्या एका पुरूष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. सोबतच एक एसएलआर रायफल, एक एअर रायफल, ब्लास्टिंगचे साहित्य, नक्षलीलिखित पुस्तके, मोबाईल फोन व एक खेचर तसेच मोठ्या प्रमाणात इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.यावर्षी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत नऊ नक्षलवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान जंगलातून जप्त केलेल्या नक्षल साहित्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींसंदर्भात मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा