शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:19 PM

आपल्या देशातील काही भागात तसेच गडचिरोलीत माओवादी, नक्षलवादी चळवळ असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. ही माओवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय पोलीस दल व गडचिरोली पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे आवाहन : धानोराच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये शस्त्रपूजा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आपल्या देशातील काही भागात तसेच गडचिरोलीत माओवादी, नक्षलवादी चळवळ असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. ही माओवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय पोलीस दल व गडचिरोली पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. नक्षलवाद व आतंकवादाचा बिमोड करण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी आमचे सैनिक दल रात्रंदिवस पहारा देत आहेत. नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) व महाराष्टÑ पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ बटालियन ११३ च्या कॅम्पमध्ये शनिवारी दसरानिमित्त शस्त्रपुजेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार, महाराष्टÑ पोलीस अंकूश शिंदे, पोलीस उपमहानिरिक्षक टी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महेंद्र पंडीत, समीर साळवे, सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा, उप कमांडंट सपन सुमन, कैलाश गंगावने, सहायक कमांडंट धनराज, वैद्यकीय अधिकारी डॉ. वरूण मिश्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, धानोराच्या नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, पं.स. सभापती अजमन राऊत, पं.स. उपसभापती अनुसया कोरेटी, तहसीलदार महेंद्र गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नामदार अहीर म्हणाले, सीआरपीएफ जवान व पोलीस जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण धानोराला भेट दिली. जनतेचा लोकशाहीवर विकास आहे. म्हणून मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.जवानांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्टÑ पोलीस व सीआरपीएफ जवान यांच्यात समन्वय असून दोन्ही विभाग खाद्यांला खांदा लावून संरक्षणाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यात महाराष्टÑ अग्रेसर आहे, असेही नामदार अहीर म्हणाले.याप्रसंगी नामदार अहीर यांनी सीआरपीएफ पोलीस जवानांशी विविध समस्यासंदर्भात हितगुज केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व पोलीस जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.झाडू लावला .....शनिवारी नामदार हंसराज अहीर यांनी बाजारवार्डातील दुर्गा मातेचे दर्शन घेतले. तसेच या परिसरात आयोजित स्वच्छता अभियान मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान त्यांनी दुर्गा मातेच्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली. याप्रसंगी खासदार अशोक नेते, ताराबाई कोटांगले, साईनाथ साळवे, अनंत साळवे, महादेव गणोरकर, कैलाश गुंडावार, शशिकांत साळवे, लता पुंगाटे, भूपतवार, मुन्ना चंदेल, राकडे महाराज, गजानन साळवे तसेच गडचिरोलीचे नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रकाश अर्जुनवार, डॉ. भारत खटी, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे आदी उपस्थित होते.