शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम शपथ घेतो की...; चौथ्यांदा मंत्री

By संजय तिपाले | Published: July 02, 2023 3:57 PM

पुन्हा एकदा अहेरीच्या राजघराण्याकडे सत्तासूत्रे.

संजय तिपाले, गडचिरोली: जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाब आत्राम हे अजित पवार यांच्यासोबतच्या बंडात सहभागी आहेत. २ जुलै रोजी त्यांनी अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम ईश्वरसाक्ष शपथ घेतो की... असे शब्द त्यांनी उच्चारताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी यापूर्वी तीननवेळा राज्यमंत्रीपद भूषविले होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊन त्यांनी चौथ्यांदा मंत्रिमंडळात समावेश एंट्री केली आहे.  

ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा धर्मरावबाबा यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे. अहेरीच्या आत्राम राजघराण्यातून आलेल्या धर्मरावबाबांनी राजकीय, सामाजिक जीवनात कायम संघर्ष केला. १९७५ मध्ये अहेरी ग्रामपंचायातचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८० मध्ये पंचायत समिती सभापतीपदी विराजमान झाले. पुढे १९९० मध्ये पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९९, २००४ व २०१९ मध्ये ते आमदार झाले. त्यांनी यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद भूषविले हाेते, आता ते नव्या राजकीय सत्तासमीकरणात भाजप- शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये त्यांनी शपथ घेतली. धर्मरावबाबांची मंंत्रिमंडळात वर्णी लागताच इकडे गडचिरोलीत जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

लोकसभेच्या तोंडावर मिळाली उभारी

धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, पण तो राष्ट्रवादीला सोडविण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली होती, शिवाय सर्व पर्याय खुले ठेवले होते. मात्र, नव्या राजकीय घडामोडीत त्यांनी अजित पवारांच्या गटासह मंत्रिपदाची शपथ घेतली. ते लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढतील, हे अनिश्चित आहे, पण त्यापूर्वी मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.राजघराण्याची परंपरा कायम

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले ते राजघराण्याच्या माध्यमातूनच. यापूर्वीच्या सरकारमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम मंत्री होते. अम्ब्रीशरावांना पराभूत करुन दहा वर्षांनंतर विधानसभेत पोहोचलेल्या धर्मरावबाबांना मंत्रिपद मिळाल्याने अहेरी व राजघराण्याच्या राजसत्तेची परंपरा कायम राहिली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली