देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत आहेत. त्यातच केंद्रातील सध्याच्या भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत प्रती बॅग ६०० ते ७१५ रुपयांची वाढ केली आहे. कोरोनाच्या महामारीत आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नाेंदविला. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सय्यद सलाम सत्तार, विमुक्त भटक्या जमाती तालुकाध्यक्ष मदनय्या पोचम मादेशी, सतीश भोगे, तालुका सचिव एम. डी. शानू, देवा येनगंदुला, विजय तोकला, कृष्णकुमार चोक्कमवार, प्रशांत पूजलवार, निखिल मग्गीडी, शंकर जिल्लेला, लक्ष्मण पुल्लुरी आदी उपस्थित होते.
===Photopath===
170521\17gad_4_17052021_30.jpg
===Caption===
तहसीलदारांना निवेदन देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी.