सध्या भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकरी बांधवांचे जीवन कठीण केलेले आहे. भांडवलदारांचे पोट भरणे सुरू आहे. कोरोनाच्या महामारीत दोन वर्षांपासून सामान्य जनता व शेतकरी उद्योगधंद्याविना मोलमजुरीविना भरडत असताना भाजपप्रणीत केंद्र सरकार रासायनिक खतांच्या किमती बेसुमार वाढवत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, सेवादल जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, महिला जिल्हाध्यक्ष सा. न्याय विभाग प्रमिला रामटेके, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, कोषाध्यक्ष कबिर शेख, महिला शहर अध्यक्षा मनीषा खेवले, सा. न्याय विभाग उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, शहर अध्यक्ष विजय धकाते, शहर उपाध्यक्ष कपिल बागडे, कृणाल चिलगेरवार, मल्ल्या कालवा, शंकर दिवटे, चंद्रशेखर खंदरे, वैभव विंदे, देवाजी नरुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने केले निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:37 AM