शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सरकारला पाठविले गोवऱ्यांचे पार्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:44 AM

एटापल्ली : घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला ...

एटापल्ली : घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यांचे पार्सल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पोस्टाने पाठविले. याशिवाय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदनही सादर केले.

महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला, असे म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी गॅस, पेट्रोल, डिझेलची सातत्याने दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे त्या म्हणाल्या.

या आंदोलनात एटापल्ली तालुका महिला अध्यक्ष ललिता मडावी, शहर उपाध्यक्ष सरिता गावडे, युवती तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बेबीताई लेकामी, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशी, बेबी हेडो, नलिनी आतकमावार, सुषमा गड्डमवार, भावना गड्डमवार, अनिता कांबळे, सुनीता कांबळे, अक्षता पर्वतलवार, सुरेखा गड्डमवार आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

(बॉक्स)

रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी भावाला रिटर्न गिफ्ट

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवून देशातील आपल्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. वर्षभरात पंतप्रधान अधूनमधून आपल्या बहिणींना ही ओवाळणी महागाईच्या स्वरूपात देतच असतात. याच प्रेमाखातर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसमार्फत आपल्या प्रधानसेवकांना रक्षाबंधनाचं रिटर्न गिफ्ट म्हणून महागाईचे प्रतीक असलेल्या शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या असल्याचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.