यावेळी शाहीन हकीम म्हणाल्या, देशाच्या रक्षणासाठी विविध प्रदेशांतून येऊन सीआरपीएफचे अधिकारी व जवान इथे परमकार्य करीत आहे. देशसेवा करताना आपल्या परिवाराला सोडून ते राहत असतात. अनेक सणांपासून ते वंचित राहत असतात. यामुळे जवान आणि अधिकारी यांना आपल्या बहिणींची उणीव भासू नये यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हा सण इथे साजरा करीत आहोत.
सीआरपीएफचे द्वितीय कमान अधिकारी शेखावत म्हणाले, महिला-भगिनींनी आमच्यावर प्रेम दाखवत जो आज सण साजरा केला आहे; त्यामुळे आमच्या डोळ्यांत अश्रू आले. देशाच्या व भगिनींच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर राहत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, तालुका सचिव पूजा गहिरवार, शहर सदस्य अनिता कांबळे, प्रमिला नामेवार, अमृता वसाखे, सपना मोहुर्ले, शारदा चिमटपवार, भारती शेंडे, काजल बैस, गुरालवार, कविता सोनुले, शोभा बोरुले, अंजू गुरनुले, रंजना मडावी, ममता पटवर्धन यांच्यासह इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.