शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 1:21 AM

अखेरच्या एका पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे.

ठळक मुद्देसरकारच्या धोरणावर टीका : गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अखेरच्या एका पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे. ही वास्तविकता असून सुद्धा शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीत गडचिरोलीचा समावेश केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव नाराज झाले आहेत. या मुद्याला घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात याव, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. दरम्यान राकाँच्या अनेक पदाधिकाºयांनी विद्यमान सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली.या आंदोलनाचे नेतृत्व राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. या आंदोलनात महिलाआघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, तुकाराम पुरणवार, प्रकाश ठाकरे, विवेक बाबणवाडे, रोशन राऊत, अब्दुल कबिर शेख, बरखत अली सय्यद, जुगनुसिंग पटवा, धनराज डोईजड, मलय्या कालवा, रफिक मोहम्मद शेख, क्रिष्णालाल पुरामे, जगन जांभुळकर, अविनाश वरगंटीवार, बंडू कोवे, कवडू बावणे, गोपी मडावी, डॉ. देविदास मडावी, सुलोचना मडावी, नितीन खोब्रागडे, देविदास आखाडे, संजय कोचे, मनिषा खेवले, निशा रामटेके, देवाजी नरूले, नजमुद्दीन खान, बुध्दाजी सिडाम, प्रकाश मुद्दमवार, रामदास गोंडाणे, जे. एम. मुप्पीडवार, राजू नैताम आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यात राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती मांडली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस