लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अल्पसंख्यांक समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.मागील आघाडी सरकारच्या काळात अल्पसंख्यांक समाजाला पाच टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले परंतु तांत्रिक बाबीमुळे शक्य झाले नाही. या समाजाला आरक्षण देणे संबंधाने वरिष्ठ पातळीवर कोणतीही कार्यवाही झाली नसून अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत आहे. अल्पसंख्याक समाजात मोडणाऱ्या सर्व जाती आर्थिक, शैक्षणिक बाबतीत कमकुवत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता या समाजाचा सहानुभूती पूर्वक विचार करून तात्काळ पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना राकाँच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख, जिल्हा कोषाध्यक्ष कबीर शेख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, तालुकाध्यक्ष विवेक बबनवाडे, इश्माईल शेख, पप्पूभाई सय्यद, जुगनूसिंग पटवा, शगीर शेख, रज्जाक शेख, जबीर शेख, कयूम शेख, जाकीर शेख, राजूसिंग दुधानी, नासिर अली, मंगलसिंग पटवा, तुकाराम पुरणवार, मुज्जकरखान पठाण, शेख, शेख हबीब, जिल्हा अल्पसंख्यांक सचिव हबीब खान पठाण, कवींद्र खेवले आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 10:33 PM
अल्पसंख्यांक समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देमागणी : अल्पसंख्याक समाजाला पाच टक्के आरक्षण द्या