गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आले. हेच आरक्षण गृहीत धरून जिल्ह्यात वर्ग ३ व ४ ची पदभरती होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या मुलांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात नोकर भरती करताना ६ टक्के आरक्षण गृहीत धरून बिंदूनामावली तयार करून पदभरती करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात ३८ टक्के असलेल्या ओबीसी बांधवांवर अन्याय होत आहे. यासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांत ओबीसीची संख्या अधिक असताना त्या गावांचा समावेश पेसा गावात करून अन्याय केला आहे. ह्या अन्यायाविरुद्ध पेटून उठून शासनस्तरावर आपला आवाज पाेहाेचविण्यासाठी ओबीसी बांधवांनी माेर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले आहे.
ओबीसी महामाेर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:32 AM