आॅनलाईन लोकमतचामोर्शी : मानवी हक्कांचे कधीही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. समाजात दिव्यांग किंवा असमर्थ व्यक्ती आहेत. त्यांना तिरस्काराच्या भावनेतून न पाहता बंधूत्त्वाच्या व मैत्रीच्या भावनेतून पाहावे हीच समस्त समाजाची बांधिलकी आहे. त्याबरोबरच सर्वसामान्य माणसांसह दिव्यांगांनी आपले हक्क व अधिकारांविषयी जागृत राहावे, असे प्रतिपादन दिवाणी न्या. एम. झेड. ए. ए. क्यू. कुरैशी यांनी केले.तालुका विधीसेवा समिती तसेच वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहरातील कृषक विद्यालयात जागृतिक एड्स दिन, असमर्थता दिवस आणि मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात मार्गदर्शन करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्या. (कनिष्ठ स्तर) एल. डी. कोरडे, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, अॅड. अनंत उंदीरवाडे, के. टी. सातपुते, अॅड. एम. डी. सहारे, रूग्णालयाचे समूपदेशक नागेश मादेशी उपस्थित होते.कार्यक्रमात अॅड. उंदीरवाडे यांनी शिबिराचे महत्त्व विशद केले. अॅड. सहारे यांनी असमर्थता या विषयावर मार्गदर्शन केले. तर के. टी. सातपुते यांनी मानवी हक्क व अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. नागेश मादेशी यांनी एड्स आजारावर माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन संजय कुनघाडकर तर आभार वर्षा लोहकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सोमेश्वर पिपरे, गिरीष मुंजमकर, जासुंदा जनबंधू, लोमेश बुरांडे, अरूण दुधबावरे, मारोती दिकोंडवार, न्यायालयाचे कर्मचारी महेंद्र पुणेकर, प्रदीप कोसरे, विजय गांगरेड्डीवार, संतोष चलाख यांच्यासह कर्मचाºयांनी सहकार्य केले.
हक्कांविषयी जागृत राहणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:45 PM
मानवी हक्कांचे कधीही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. समाजात दिव्यांग किंवा असमर्थ व्यक्ती आहेत.
ठळक मुद्देदिवाणी न्यायाधीशांचे प्रतिपादन : चामोर्शीतील कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन