अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वांत जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र, बहुतांशी गाड्या जुनाट आहे. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहे. येथून आंतरराज्यीय बससेवाही चालविली जाते. या आगाराला सरकारने नव्या गाड्या द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शस्त्रक्रियेला प्रतिसाद कमी
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
निधीअभावी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्यावतीने शेकडो बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या बंधाऱ्यांसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले आहे. निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
तलावाभोवती अतिक्रमण
गडचिरोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचन विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न हाेत आहे. तलाव साैंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे.
सिरोंचा भागात वृक्षतोड
सिरोंचा : तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या अवैध वृक्षतोड जोमात सुरू आहे. छत्तीसगड राज्यातील तस्कर नदीमार्ग मोठ्या प्रमाणावर मौल्यवान सागवान घेऊन जात आहेत. वनविभागाने मोहीम तीव्र केली असली तरी तस्करी सुरूच आहे. अनेकजण तेलंगणात सागवानाची तस्करी करतात.
विश्रामगृहाची मागणी
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे.