लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम केले आहेत. त्यांतर्गत खासगी व्यक्तीला वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरायचे असेल तर संबंधित तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. सदर नियम ४ एप्रिलपासून लागू केला जाणार आहे.केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरून फिरताना दिसतात. वाहनांची संख्या बघितली तर खरच संचारबंदी लागू आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आली. त्यामुळे ३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये सामान्य व्यक्तीला चारचाकी व दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरायचे असेल तर तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. भाजीपाला विकणारे शेतकरी, अत्यावश्यक सेवेतील शासकीय/निमशासकीय व खासगी वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल विक्रीवर मात्र कोणतेही प्रतिबंध घालण्यात आलेले नाही. मात्र संबंधित वाहनचालकाला त्याबद्दलचे कार्यालयीन ओळखपत्र पेट्रोलपंप मालकाला दाखविणे अनिवार्य राहणार आहे.पेट्रोलपंपधारकांनी ज्या वाहनांकरीता पेट्रोल किंवा डिझेलची विक्री केली आहे, त्याचा संपूर्ण तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसºया दिवशी ११ वाजता न चुकता सादर करावा लागणार आहे.दुकानांची वेळ आता दुपारी १ वाजेपर्यंतचजीवनावश्यक वस्तू, भाजी, फळे, अंडी, दुध, ब्रेड, मांस इत्यादींचे विक्री करणारे दुकाने ४ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू राहतील. या दुकानांव्यतिरिक्त औषधीची दुकाने व पेट्रोलपंप नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.संचारबंदी होणार कडककोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे व एकमेकांपासून अंतर ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही काही नागरिक वाहने धरून अनावश्यक फिरत होते. त्यांना पेट्रोलच मिळणार नसल्याने फिरण्यावर प्रतिबंध येणार आहे.
पेट्रोल पाहिजे? मग आणा तहसीलदारांचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM
केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरून फिरताना दिसतात.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अनावश्यक फिरण्यावर येणार प्रतिबंध