स्वातंत्र्याच्या पूर्वी सिराेंचा हा ब्रिटिश राजवटीचा जिल्हा हाेता. सध्याचे तहसील कार्यालय हे ब्रिटिश सैन्याचा कॅम्प हाेता. या ठिकाणी घाेडे बांधत हाेते. पिण्याच्या पाण्याचे स्त्राेत म्हणून त्यांनी एक विहीर बांधली. दगडाने बांधलेल्या या विहिरीमध्ये इंग्रजांनी माेठे जाड तांब्याचे पत्रे बसविले. हे तांब्याचे पत्रे नेहमी पाण्यामध्ये बुडून राहतात. तांब्याचा स्पर्श झालेले पाणी अतिशय शुद्ध मानले जाते. हे पाणी डायरिया, पिलिया व अतिसार, हागवण तसेच अन्य आजारांना कारणीभूत बॅक्टेरियाला संपवून टाकते. तांब्यामध्ये ज्वलंतकारी गुण असल्यामुळे पाचन शक्ती सुदृढ हाेते. आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त आदींचे संतुलन करते. सांधेदुखी, गुडघेदुखी, वजन कमी करण्यास व जखम थांबण्यास अत्यंत लाभदायी असते. अशाप्रकारे आयुर्वेदिक विहिरींचे महत्त्व व माहिती नसल्यामुळे ब्रिटिशकालीन विहीर सध्या उपेक्षित आहे.
या विहिरीच्या आजूबाजूला लहान झाडे वाढल्यामुळे येथे विहीर आहे किंवा नाही, याचाही थांगपत्ता लागत नाही. दुसरे कारण म्हणजे घराेघरी नळ असल्यामुळे आता विहिरीचे महत्त्व कमी झाले आहे. विहिरीच्या महत्त्वाची माहिती असणारे काही लाेक मुद्दाम याच विहिरीचे पाणी पित हाेते, हे विशेष.
बाॅक्स...
एकदा झाली हाेती दुरूस्ती
सिराेंचाचे तहसीलदार म्हणून ज्यावेळी श्रीकांत पाटील धुरा सांभाळत हाेते, त्यावेळी त्यांनी या विहिरीबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी काही जाणकार लाेकांना पुण्यावरून बाेलावून कॅमेऱ्याच्या मदतीने या विहिरीतील तांब्याच्या पत्र्यांचे निरीक्षण त्यावेळी करण्यात आले हाेते तसेच त्याचवेळी या विहिरीची दुरूस्ती झाली हाेती.