गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून काेराेना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून बुधवारला १८५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज चार जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला.
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ११ हजार ३८३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १० हजार ४०५ वर पोहाेचली. तसेच सद्या ८५६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १२२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. चार नवीन मृत्यूमध्ये गोकूलनगर गडचिरोली येथील ६६ वर्षीय पुरुष, गुरनुली, कुरखेडा येथील ६० वर्षीय महिला, कोरेगाव, वडसा येथील ४५ वर्षीय महिला व रामनगर, गडचिरोली येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.४१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ७.५२ टक्के तर मृत्यू दर १.०७ टक्के झाला.
नवीन १८५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये ६७, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये १४, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये १४, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये ११, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये ८, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये ९, एटापल्ली ७, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये ४, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ६, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ३, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ५, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये २७, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये १० जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २८ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १७, अहेरी ३, आरमोरी ४, चामोर्शी १, एटापल्ली २, कुरखेडा १ जणांचा समावेश आहे.