वन विभागाकडे सर्वाधिक जागा आणि मनुष्यबळ उपलब्ध असल्याने ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करताे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद तसेच बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना विभाग हे केवळ वृक्षलागवडीचा देखावा निर्माण करतात. वृक्षलागवड करताना फोटो काढून घेणे आणि त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून करणे, एवढ्यापुरते सोंग केले जाते.
मागील वर्षी आरमोरी तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींनी तसेच बांधकाम विभागाने मुख्य रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली, त्यातील १० टक्केही वृक्ष सध्या जिवंत नाहीत. वन विभागवगळता इतर यंत्रणांनी लावलेले वृक्ष भुईसपाट झाले. रस्त्याच्या कडेला वृक्ष जिवंत राहात नाही, हा दरवर्षीचा अनुभव असतानाही कुरखेडा तालुक्यातील कढाेली - वाशी मार्गावर वृक्ष लागवडीसाठी नव्याने खड्डे तयार केले जात आहेत. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले जाते. परंतु देखभाल व संगाेपनाअभावी ही रोपे जिवंत राहात नाहीत, ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यात दिसून येते.
बॉक्स.
तृणभक्ष्यी अन्नसाखळी नष्ट
वनविभागाद्वारे घनदाट जंगलातील खुरट्या जंगलाची कोरका कटाई करून मानवीकृत रोपवाटिका तयार करण्याचे काम दरवर्षी मोठ्या प्रमाणात केले जाते. झुडपी जंगलातील लहान झाडे तोडली जात असल्याने तृणभक्ष्यी प्राण्यांचा निवारा तसेच चारा नष्ट होताे. तसेच लहान वृक्षांच्या कटाईमुळे पक्ष्यांच्या घरट्यांची जागा नष्ट केली जाते. परिणामी अन्नसाखळी नष्ट होण्याचा धोका आहे. वन विभाग व इतर यंत्रणा वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेतात. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु वृक्षलागवड करून रोपे जिवंत राहात नसल्याने या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. झुडपी जंगल तोडून वृक्ष लागवड करण्यापेक्षा ओसाड जागेत वृक्षारोपण व संवर्धन करावे, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त हाेत आहे.
===Photopath===
120521\12gad_3_12052021_30.jpg
===Caption===
वृक्षाराेपणासाठी कढाेली-वाशी मार्गावर खोदलेले खड्डे.