गडचिराेली शहरात एकच स्वर्गरथ आहे. हा स्वर्गरथ जुना आहे. तसेच गडचिराेली शहराची लाेकसंख्या जवळपास ६० हजार एवढी आहे. एकाच दिवशी कधी कधी तीन ते चार नागरिकांचा मृत्यू हाेते. बाेरमाळा घाट व कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जातात. हे दाेन्ही घाट गडचिराेली शहरापासून जवळपास ३ किमी अंतरावर आहेत. त्यामुळे प्रत्येक मृतकाचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी स्वर्गरथाची मागणी करतात. एकाच दिवशी एकापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यास एकाचा मृतदेह नेऊन स्वर्गरथ परत येईपर्यंत दुसऱ्याचा मृतकांच्या नातेवाइकांना प्रतीक्षा करीत राहावे लागते. याला बराच उशीर हाेत असल्याने मृतकाच्या नातेवाइकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत हाेता. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने स्वर्गरथ खरेदी केला आहे. नवीन स्वर्गरथाच्या दाेन्ही बाजूंना काच लावण्यात आले आहे. त्यामुळे ताे पारदर्शक आहे.
गडचिराेलीत नवीन स्वर्गरथ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:40 AM