एका नीलगायीचा काही कुत्रे पाठलाग करत असल्याचे दृष्य भामरागडवरून आलापल्लीकडे येणाऱ्या एका एसटी बसच्या चालकास दिसले. त्या चालकाने आलापल्लीत आल्यानंतर ही घटना काही जागरूक नागरिकांना सांगितली. त्यापैकी एकाने नीलगायीला कुत्र्यांपासून वाचविण्यासाठी उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांना मोबाईलवरून माहिती दिली. देवगडे यांनी लगेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. पण, तोपर्यंत नीलगायीचा मृत्यू झाला होता.
अहेरीचे पशुधन अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर उपविभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ७.३० वाजता नीलगायीला अग्नी देण्यात आला. यावेळी फिरत्या पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. निर्मल, वनपाल नामदेव बावणे, अनिल झाडे, दामोदर चिव्हाने, एस. पी. जांभुळे, वन्यजीवप्रेमी रामू मादेशी, किशोर सडमेक आदी उपस्थित होते.