गडचिराेली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळानंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. काेविड-१९ विषयक नियमांचे पालन करून शाळा भरविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापासून सुटी हाेईपर्यंत विशेष खबरदारी घेतली जात आहे. यातही शाळांना मिळालेल्या निर्देशानुसार शिक्षक नियमांची अंमलबजावणी करीत असल्याने अनेक विद्यार्थी पालकांपुढे मला चाॅकलेट नकाे पण सॅनिटायझर हवे, असा हट्ट करीत आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करीत असताना काेराेनाच्या संसर्गापासून बचाव करण्याकरिता तसेच विशेष उपाययाेजना म्हणून प्रत्येक शाळांमध्ये हात धुण्याची व्यवस्था, थर्मल स्क्रिनिंग, शारीरिक अंतर राखणे आदी व्यवस्था व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी घरूनच मास्क लावून शाळेत प्रवेश करतात. साेबत स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझरचा वापर करतात. शहरी भागातील संपूर्ण शाळांमध्ये ही व्यवस्था पहावयास मिळते. परंतु ग्रामीण भागातील माेजक्याच शाळांमध्ये विद्यार्थी सॅनिटायझरचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या सांगण्यानुसार सॅनिटायझरसाठी पालकांकडे हट्ट करीत आहेत. त्यामुळे पालकांना वेळाेवेळी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे लागते.
बाॅक्स ..
एकही बाधित नाही
गडचिराेली जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळून आलेला नाही. नियमांचे पालन करूनच वर्ग भरविले जात असल्याने सध्या विद्यार्थी काेराेनाच्या संसर्गापासून बरेच लांब आहेत.
काेट .....
गडचिराेली शहरात बहुतांश खासगी शाळा आहेत. यात आमच्या शाळेचासुद्धा समावेश आहे. आम्ही दरराेज घरून निघताना मास्कचा वापर करताे. साेबत स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझर ठेवत असताे. शाळेत प्रवेश करताच हाताला सॅनिटायझर लावताे. अधिक गर्दी करीत नाही किंवा गर्दीमध्ये जाण्याचे टाळताे.- संचित भाेपये, विद्यार्थी.
काेट ....
काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे शाळेच्या पहिल्या सत्रातील अभ्यास बुडाला. मात्र आता शाळा सुरू झाल्याने उर्वरित अभ्यास तरी पूर्ण करता येईल, अशी आशा आहे. शाळा सुरू झाल्याने खबरदारी घ्यावी लागत असली व तसेच सॅनिटायझरचा वापर करावा लागत असला तरी दरराेज वर्ग भरत असल्याने अभ्यासात मन रमत आहे. - समृद्धी चाैधरी, विद्यार्थिनी
काेट .....
आमची शाळा ग्रामीण भागात असल्याने काेराेनाची भीती फारशी वाटत नाही. तरीसुद्धा शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला मास्क व सॅनिटायझरचा वापर नेहमी करावा लागताे. शाळा सुरू हाेत असताना खरेदी केलेला सॅनिटायझर आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सॅनिटायझरसाठी बाबांकडे मागणी करावी लागेल. - गायत्री देशमुख, विद्यार्थिनी.