लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या घोटसूर येथील आयुर्वेदीक दवाखाण्यातील डॉक्टरचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. डॉक्टरच नसल्याने उपचार होत नाही.घोटसूर गाव कसनसूरपासून नऊ किमी अंतरावर छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. या गावात शासनाने आयुर्वेदीक दवाखाना मंजूर केला आहे. या दवाखाण्यात आठ पदे मंजूर आहेत. घोटसूर येथे आश्रमशाळा आहे. तसेच या परिसरातील हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक घोटसूर येथील नागरिक उपचारासाठी येत होते. घोटसूर ते कसनसूर हे नऊ किमीच्या अंतरावर नदी, नाले आहेत. तसेच रस्ता नसल्याने पायवाटेप्रमाणे स्थिती आहे. पावसाळत दुचाकी चालविणे कठीण होते. परिणामी रूग्ण उपचारासाठी घोटसूर येथील रूग्णालयावरच अवलंबून राहतात. उपचार करणे हे डॉक्टरचे काम आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टरच नसल्याने उपचार होत नाही. या ठिकाणी प्रशस्त इमारत आहे. डॉक्टर नसल्याने आश्रमशाळेचे विद्यार्थी व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करीत कसनसूर येथे जावे लागते. कसनसूरच्या रूग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने रूग्ण दगावण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या रूग्णालयात एक डॉक्टर व दोन परिचारिकांची पदे मंजूर आहेत. मात्र तीन वर्षांपासून डॉक्टर व परिचारिकांची पदे रिक्त आहेत.एटापल्ली तालुक्यात खासगी रूग्णालये नाही. येथील नागरिकांना सरकारी रूग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. मात्र या रूग्णालयांमध्येही कधी औषध राहत नाही, तर कधी डॉक्टर, परिचारिका उपस्थित राहत नाही. अशी गंभीर स्थिती आहे. तालुक्यातील कुपोषण, माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करायचे असेल तर आरोग्य यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
तीन वर्षांपासून दवाखान्यात डॉक्टरच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:47 AM
या दवाखाण्यात आठ पदे मंजूर आहेत. घोटसूर येथे आश्रमशाळा आहे. तसेच या परिसरातील हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक घोटसूर येथील नागरिक उपचारासाठी येत होते. घोटसूर ते कसनसूर हे नऊ किमीच्या अंतरावर नदी, नाले आहेत. तसेच रस्ता नसल्याने पायवाटेप्रमाणे स्थिती आहे. पावसाळत दुचाकी चालविणे कठीण होते. परिणामी रूग्ण उपचारासाठी घोटसूर येथील रूग्णालयावरच अवलंबून राहतात.
ठळक मुद्देइतरही पदे आहेत रिक्त : घोटसूर परिसरातील नागरिकांची अडचण