चामोर्शी तालुक्यातील आमगाव महाल गावालगत असलेल्या पोहार नदीपात्रातून अज्ञात लाेकांनी अवैधरीत्या रेतीचा उपसा करून जवळ असलेल्या शेत शिवारात साठवणूक केली हाेती. त्यानंतर कायदेशीर लिलाव प्रक्रिया प्रशासनाकडून ठराविक वेळेत पूर्ण करण्यात आली; परंतु विरोधकांनी कोणतीही चौकशी न करता रान उठवून पत्रकार परिषद घेऊन प्रशासन व ठेकेदारावर सूडबुद्धीने आरोप केले. या प्रकारामुळे गावात आपापसात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. गावात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने विराेधकांनी रेती लिलावावरून राजकारण न करता गाव विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले. चामाेर्शी तालुक्यातील आमगाव महाल येथील नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून पुंडलिक पोचू वाळके यांच्या शेतातील सर्व्हे नंबर २५८ मधील रेती साठवणूक केल्याप्रकरणी लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन महसूल प्रशासनाच्या संमतीने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात आली, असे सरपंच जोत्स्ना गव्हारे, उपसरपंच विनोद सेंगर, माजी ग्रा.पं. सदस्य नाजूक वाळके, वंदना बैस, तंटामुक्त समिती अध्यक्ष निकेश जुवारे, यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बाॅक्स
जाहीरनाम्यातून रेतीसाठ्याचा लिलाव
जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव करण्यासाठी गावात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. अवैध आढळलेल्या ३०२ ब्रास रेतीसाठ्याची लिलाव प्रक्रिया १२ मे २०२१ राेजी घेण्यात आली. या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या अधिनस्त राहूनच प्रक्रिया पार पाडण्यात आली. कोणत्याही प्रकारे रेतीची अवैध तस्करी झालेली नाही. विराेधकांनी केलेले आराेप चुकीचे व राजकीय द्वेषभावनेतील आहेत. विरोधकांनी विनाकारण कांगावा न करता गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सांगितले.
===Photopath===
220521\img-20210522-wa0127.jpg
===Caption===
पत्रकार परिषद फोटो