कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका वैष्णवी नैताम, अल्का पोहनकर, मुख्याधिकारी संजीव ओव्होड, उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, शिक्षण विभागप्रमुख बंडू ताकसांडे, केंद्रप्रमुख सुधीर गोहणे, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, मुख्याध्यापिका मंगला रामटेके, नयना चन्नावार, ज्याेती साळवे, माधुरी मस्के, साखरे, उईके, जुमनाके आदी मान्यवर उपस्थित हाेते.
आपल्या विद्यार्थ्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते म्हणून ते वेळोवेळी विध्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी शिक्षकांनाही वेळोवेळी होणारे बदल स्वीकारावे लागतात. एका अर्थाने शिक्षक आयुष्यभर स्वतः शिकत असतात, अनेक बदल स्वीकारत असतात. आपल्याला आलेले अनुभव शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात. यातून भावी पिढी समृद्ध होत असते. व्यक्तींच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.
याप्रसंगी नगर परिषदेच्या सर्वच १० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांचा अहवाल सादर केला.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र शेडमाके यांनी केले, तर आभार सूर्यकांत मडावी यांनी मानले.
बाॅक्स :
या शाळांचे रूप पालटणार
शहरातील इंदिरानगर नगरपरिषद शाळा व सावित्रीबाई फुले गोकुळनगर या शाळांसाठी १.५० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला आहे, तर रामपुरी न. प. शाळा रामपूरसाठी १ कोटी ३० लक्ष रुपयांची निविदा प्रक्रिया झालेली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, तसेच १० शाळांसाठी संगणक देण्यात येणार आहेत, अशी माहीती नगराध्यक्ष पिपरे यांनी यावेळी दिली.