शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाला नाही

By admin | Published: November 06, 2016 1:40 AM

आंबेशिवणी ग्रामपंचायतीसाठी थोड्या अधिक किंमतीच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या असल्या तरी त्या वस्तूंचा दर्जा अतिशय चांगला आहे.

पत्रपरिषद : आंबेशिवणीच्या सरपंचाची माहिती गडचिरोली : आंबेशिवणी ग्रामपंचायतीसाठी थोड्या अधिक किंमतीच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या असल्या तरी त्या वस्तूंचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे साहित्य खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नाही. योगाजी कुडवे यांनी केलेले आरोप चुकीचे असून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, अशी माहिती आंबेशिवणी ग्रामपंचायतीचे सरपंच माणिक झंझाळ यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.ग्रामपंचायतीने संगणक खरेदीदरम्यान मासिक सभेत ठराव घेऊन पुरवठादाराकडून दरपत्रक मागितले होते. कमी दर असलेल्या पुरवठादाराकडून संगणक खरेदी करण्यात आले. सदर संगणक चांगल्या कंपनीचा आहे. संगणकासोबत एकाच ठिकाणी प्रिंटर, झेरॉक्स, स्कॅनरची सुविधा असलेली मशीन खरेदी करण्यात आली. ग्रामपंचायतसमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. या कामाचे १ लाख ४९ हजार ३८० रूपयांचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. त्यानुसार काम पूर्ण करण्यात आले. कामाचे मूल्यांकन मात्र १ लाख ६६ हजार ४२ रूपयांचे झाले. प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने मात्र १ लाख ४९ हजार ३८० रूपयेच खर्च केले आहेत. ग्रामपंचायतमधील प्रत्येक वस्तूंची खरेदी मासिक सभेदरम्यान ठराव घेऊनच केली जाते. यादरम्यान दरपत्रकेसुद्धा ग्रामपंचायत सदस्यांसमोर ठेवली जातात. ग्रामपंचायतीचा संपूर्ण व्यवहार अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे. आंबेशिवणी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजना विद्युत बिल थकल्याने बंद होती. ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून २४ हजार रूपये जमा केले व नळ योजनेचे विद्युत बिल भरले. तेव्हापासून नळ योजना अतिशय सुस्थितीत सुरू आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत अनेक विकासकामे झाली आहेत. मात्र अनावश्यक तक्रारी करून विकासकामात अडथळे निर्माण केले जात आहेत. करण्यात आलेले आरोप निराधार असून योगाजी कुडवे जनतेचीही दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माणिक झंझाळ यांनी पत्रकार परिषदेतून केला.पत्रकार परिषदेला विलास म्हशाखेत्री, देविदास आत्राम, घनश्याम म्हशाखेत्री, घनश्याम गावतुरे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)