शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

ना सॅनिटायझर, ना चेहऱ्यावर मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:00 AM

सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देबँकांच्या एटीएममधील बेजबाबदारपणा : नागरिकही बिनधास्त, तक्रार करण्यासाठी कुणालाच वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ७५० पेक्षा वर गेला आहे. मात्र कोरोनाच्या या वाढत्या आकड्यासोबत नागरिकांमधील बिनधास्तपणा आणि बँकांसारख्या जबाबदार घटकांचा बेजबाबदारपणाही वाढत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्टपणे दिसून आले. दिवसभरात शेकडो लोकांचा संपर्क येऊन बटनांना थेट स्पर्श होणाºया बँकांच्या एटीएममध्ये साधे सॅनिटायझर ठेवण्याचे सौजन्यही बहुतांश बँकांनी दाखविलेले नाही.विशेष म्हणजे याबाबत आजपर्यंत कोणीही बँकांकडे तक्रार केलेली नाही. उलट स्वत:च विनामास्क येऊन एटीएममधील व्यवहार करून बिनधास्त पुढच्या कामाला लागणाऱ्यांचे प्रमाण अर्ध्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे हे बिनधास्त नागरिक कोरोनाचे वाहक तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोणावर कारवाईच होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांसोबत आता बँकांसारखे जबाबदार घटकही बिनधास्त झाले आहेत.कळते पण वळत नाही अशी सर्वांची स्थितीसर्वाधिक व्यवहार होणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता आणि सॅनिटायझरचीही व्यवस्था नव्हती. काही लोक नाकातोंडावर मास्क किंवा रूमाल लावून येत होते, पण जास्तीत जास्त लोक याबाबतीत बिनधास्त होते. कोरोनाच्या स्थितीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून येत नव्हता. हीच स्थिती बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक यांच्या एटीएममध्ये दिसून आली. काही नागरिकांना या बिनधास्त वागण्याबद्दल हटकले असता किती वेळा सॅनिटायझर लावणार? असा प्रश्नार्थक सूर व्यक्त करत त्यांनी एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याबद्दल कोणतीही हरकत घेण्यास नकार दिला. बहुतांश लोकांनी मात्र सॅनिटायझर असायला हवे असे सांगत ते असते तर वापर केला असता. पण नाही म्हणून कोणाकडे तक्रार करणार नाही, तेवढा वेळ कोणाला आहे? असे म्हणून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.जिल्हा बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सुसज्जगडचिरोली शहरात कार्यरत असणाऱ्या विविध बँकांमध्ये लोकमत चमुने प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या दोनच बँकांच्या एटीएम मध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या एटीएमबाहेर सुरक्षा रक्षक आणि आतमध्ये सॅनिटायझरची बाटलीही होती. पण मोजकेच लोक त्याचा वापर करत होते. अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये व्यवहार आटोपल्यानंतर सुरक्षा रक्षक आपल्या हाताने सॅनिटायझर देत होता.स्टेट बँकेच्या प्रत्येक एटीएममध्ये आधी तीन सुरक्षा रक्षकांची आळीपाळीने २४ तास ड्युटी रहायची. पण वरिष्ठ स्तरावरूनच सुरक्षा रक्षकांची सेवा बंद करण्यात आली. आम्हाला आमच्या स्तरावर एटीएम मध्ये, बँकेत सॅनिटायझर ठेवण्याचा अधिकार आहे. त्याबाबत योग्य ती खबरदारी घेऊ पण नागरिकांनीही आपली जबाबदारी निट सांभाळली पाहीजे.- एस.एफ.येसनसुरे,शाखा व्यवस्थापक, एसबीआय गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या