बुधवारपासून जिल्हा परिषदेसह नगरपालिका, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित, तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग भरविले जाणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व प्रशासनानेसुद्धा तयारी केली आहे. काेविडच्या नियमांचे पालन करीत इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग भरवून त्यांच्या अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
बाॅक्स...
पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या
पाचवी १३,११६
सहावी १२,३७७
सातवी १२,९६५
आठवी १२,१४१
बाॅक्स...
हमीपत्र स्वीकारणे सुरू
इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग गेल्या दीड महिन्यापासून प्रत्यक्ष शाळांमध्ये भरविले जात आहेत. या वर्गांमध्ये हळूहळू विद्यार्थी उपस्थिती वाढत आहे. मात्र हे वर्ग भरविण्यासाठी शासन निर्णयानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे हमीपत्र भरून घेणे आवश्यक आहे. माध्यमिक वर्गांसाठी शिक्षकांनी पालकांचे हमीपत्र भरून घेतले. आता पाचवी ते आठवीसाठीसुद्धा पालकांचे हमीपत्र घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक, पालकांचे हमीपत्र स्वीकारणे सुरू केले आहे.
बाॅक्स....
खंड पडल्याने मनाची तयारी नाही
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शालेय शिक्षण म्हटले की, शिस्त आली. शिस्तीतूनच शालेय विद्यार्थी घडत असतात. मात्र, काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळांमध्ये प्राथमिक वर्ग भरविण्यास पूर्णत: ब्रेक लागला आहे. आता पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्यासाठी प्रशासन कार्यवाही करीत असली तरी शिक्षण प्रक्रियेत खंड पडल्याने अनेक विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत येण्याबाबत मनाची तयारी दिसून येत नसल्याचे काही विद्यार्थी व पालकांशी संवाद साधल्यानंतर कळून आले. ग्रामीण भागात खासगी शिकवणी नाहीत; मात्र शहरी भागात शिकवणीची सुविधा आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी गावातील शाळांमध्ये निर्भर असल्याने ते २७ जानेवारीपासून नियमितपणे शाळांमध्ये जाण्यास प्राधान्य देणार आहेत.
काेट...
काेराेनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनात हाेमवर्क, तसेच लेखन, वाचन व इतर काम घरी करावे लागत आहे. प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकणे व घरी राहून शिकणे यात फरक आहे. आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू हाेत असल्याने आम्हाला आनंद झाला असून, आम्ही नियमित शाळेत जाणार आहाेत.
- आकाश बारसागडे, इयत्ता सातवी
काेट....
खूप महिन्यांनी शाळा सुरू हाेत असल्याने मनाची तयारी फारशी नाही. मात्र, शाळेत गेल्याशिवाय करमत नसल्याने आम्ही विद्यार्थिनी शाळेत जाणार आहाेत.
- आचल थाेराक, इयत्ता सहावी
काेट...
शाळा बंद असल्याने दिवसभर आम्ही मित्र खेळण्यावर भर देत आहाेत. शाळा सुरू झाल्यावर आम्हाला शाळेत गेल्याशिवाय पर्याय नाही. आई-वडिलांच्या सल्ल्याने शाळेत जाणार.
- अनमाेल उंदीरवाडे, इयत्ता पाचवी
काेट....
काेराेना लाॅकडाऊनच्या काळात माेबाईलच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम अभ्यासण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या गावाकडे माेबाईल, इंटरनेट व कव्हरेजची समस्या आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण कुचकामी ठरले. प्रत्यक्ष वर्ग भरण्याच्या निर्णयाचे स्वागत करते.
- तेजस्विनी राऊत, इयत्ता आठवी