शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

आदिवासीबहुल भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 2:13 PM

भारतीय निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिलेला ‘नोटा’चा पर्याय यावेळी राज्यातील आदिवासीबहुल मतदार संघांमध्ये सर्वाधिक वापरण्यात आला आहे.

ठळक मुद्देपालघर व गडचिरोली पुढे ईव्हीएमवरील शेवटच्या बटनाचा परिणाम?

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिलेला ‘नोटा’चा पर्याय यावेळी राज्यातील आदिवासीबहुल मतदार संघांमध्ये सर्वाधिक वापरण्यात आला आहे. अनेक अशिक्षित मतदारांनी ईव्हीएमवरील सर्वात खाली असलेले बटन दाबल्याने नोटाचे मतदान वाढले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मतपत्रिकेवरील कोणीही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’, अर्थात ‘नन आॅफ द अबोव्ह’ (यापैकी कोणीही नाही) असा पर्याय ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर सर्वात शेवटी दिला जातो. अशिक्षित मतदारांना ईव्हीएमवरील कोणते बटन दाबायचे हे कळले नसल्यामुळे शेवटचे बटन दाबून ते मोकळे होतात, असा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. त्यामुळेच की काय आदिवासीबहुल, मागास भागात नोटाच्या मतांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीतही गडचिरोली-चिमूर क्षेत्रात नोटाला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान होते.राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत. याशिवाय ठाणे, नंदूरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यांतही नोटाचे प्रमाण जास्त आहे. केवळ मतदारांच्या अशिक्षितपणामुळे त्यांच्याकडून नोटाचा पर्याय निवडल्या जात असेल तर यापुढील निवडणुकांमध्ये योग्य ती सुधारणा करावी अशीही मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.मुंबईतही नोटाप्रगत मुंबईमधील सहाही मतदार संघात नोटाचे प्रमाण जास्त आहे. त्यात मुंबई-दक्षिण (१.८९ टक्के), मुंबई-उत्तर (१.२१ टक्के), मुंबई उत्तर-मध्य (१.१८ टक्के), मुंबई उत्तर-पूर्व (१.३७), मुंबई उत्तर पश्चिम (१.९४ टक्के) आणि मुंबई दक्षिण मध्य (१.७५ टक्के) असे नोटाचे प्रमाण आहे.‘नोटा’धारक टॉप १० मतदारसंघपालघर                              २९,४७९               २.४५ %गडचिरोली-चिमूर               २४,५९९              २.१५ %नंदूरबार                            २१,९२५                 १.७१ %ठाणे                                   २०,४२६                 १.७५ %मुंबई उत्तर-दक्षिण                १८,२२५                 १.९४ %भिवंडी                               १६,३९७                    १.६३ %मावळ                            १५,७७९                      १.१५ %जालना                              १५,६३७                  १.२९ %मुंबई दक्षिण                      १५,११५                  १.८९ %कल्याण                            १३,०१२                  १.४६ %

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल