गडचिराेली : सुमाे, कार, झायलाे, स्कार्पिओ, आदी प्रवासी वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या गडचिराेली शहरासह जिल्ह्यात माेठी आहे. सरकारच्या वतीने पेट्राेल व डिझेलचे दर वाढविण्यात आल्याने गेल्या एक ते दीड वर्षात प्रवासी वाहन भाड्यात १० टक्के वाढ करण्यात आली आहे.
पाच वर्षांपूर्वी इंधनाचे दर कमी हाेते. त्यावेळी नागपूरला ये-जा करण्यासाठी तीन हजार रुपये लागत हाेते. आता नागपूर प्रवासासाठी एक दिवसाची बुकिंग चार ते साडेचार हजार रुपये आहे. माेठ्या गाडीसाठी एक हजार रुपये अधिक पडतात. बुकिंगवरील वाहनाच्या चालकाला प्रतिदिवस ५०० रुपये मजुरी म्हणून द्यावी लागत आहे. अनेकजण प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायात उतरले आहेत. काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान हा व्यवसाय थंडावला हाेता. आता हा व्यवसाय पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे.
काेट...
केंद्र सरकारच्या वतीने गेल्या दाेन वर्षांपासून डिझेल व पेट्राेलच्या दरात सातत्याने वाढ करीत आहे. जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत चार ते पाच वेळा इंधनच्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे आम्हाला साहजिकच प्रवासी भाड्याच्या दरात वाढ करावी लागली. त्याशिवाय गाडीचा देखभालखर्च भरून निघत नाही.
- मुरलीधर गाेहणे, वाहन चालक-मालक
.....
मी माेठे वाहन चालविताे. तसेच दूरवर कारची बुकिंग नेताे. आधीच्या तुलनेत २०२१ मध्ये प्रवासी भाड्यात वाढ झाली आहे. याचे कारण पेट्राेल व डिझेलच्या दरात झालेली भरमसाट वाढ हाेय. प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय परवडण्यासाठी बुकिंगच्या भाडेदरात वाढ करावी लागली.
- अश्पाक पठाण, वाहनचालक
.............
पेट्राेल डिझेल
जानेवारी २०१९ ६७.३७ ५७.१४
जानेवारी २०२० ७९.३९ ६८.९४
जानेवारी २०२१ ९०.९८ ७९.९६
ऑगस्ट २०२१ १०८.४३ ९६.५९
............
वाहनाचा प्रकार प्रति किमी. दर
सुमाे १४ रु.
कार १२ रु.
झायलाे १४ रु.
स्कार्पिओ १४ रु.