लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आर्थिक तरतूद प्राप्त झाल्यावर दाेन ते तीन आठवड्यांनंतर प्राथमिक शिक्षक संवर्गाचे वेतन अदा करण्यात येत हाेते. दरम्यान, जि. प. प्रशासनाने इतर कर्मचारी संवर्गाप्रमाणे शिक्षकांचेऑनलाइन पद्धतीने सीएमपी प्रणालीद्वारे वेतन करण्याची कार्यवाही केली असून, सीएमपी प्रणाली यशस्वी झाली आहे. त्यामुळे तरतूद प्राप्त हाेताच शिक्षकांचे मासिक वेतन तीन दिवसांत अदा करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. पूर्वी शिक्षकांचे वेतन ऑफलाइन पद्धतीने केल्या जात हाेते. दरम्यान, सर्व तालुक्यांकडून दरमहा शिक्षकांच्या वेतनाची मागणी हाेणे, वरिष्ठ कार्यालयास तरतुदीची मागणी करणे, त्यानंतर प्राप्त तरतूद सर्व तालुक्यास वितरित करणे या अवघड प्रक्रियेमुळे तसेच सर्व तालुक्यांकडून माहिती प्राप्त हाेताना त्यात समन्वय नसणे, यामुळे शिक्षकांचे वेतन विहित वेळेत करण्यास अडचणी येत हाेत्या. अशा परिस्थितीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिक्षकांचे वेतन विनाविलंब अदा करण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बाेलाविली. या बैठकीत शिक्षकांचे वेतन सीएमपीद्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उमेशकुमार गायकवाड यांची सभा जि.प.सीईओ आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान, जि.प.च्या एकूण ३ हजार ७४० शिक्षकांचे जून २०२१ पासूनचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे अदा करण्याची कार्यवाही करण्यात आली.ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी उमेशकुमार गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, बँकेचे अधिकारी व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
शिक्षकांचे वेतन दरमहा तरतूद प्राप्त हाेताच तीन दिवसांत व्हावे, ही माझ्या प्राधान्यक्रमातील बाब हाेती. सीएमपी प्रणाली कार्यान्वित झाली असून, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.) हेमलता परसा, लेखाधिकारी वैभव बारेकर यांच्यासह लिपिक, १२ तालुक्यांचे समन्वयकांनी केलेले प्रयत्न काैतुकास्पद आहे.- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिराेली
जालना जिल्हा परिषदेतून जाणली प्रक्रियेची माहितीशिक्षण विभागाचे प्रभारी लेखाधिकारी वैभव बारेकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा चमू जालना जिल्हा परिषदेमध्ये पाेहाेचला. तेथे ऑनलाइन पद्धतीने सीएमपीद्वारे वेतन अदा करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. ऑनलाइन पद्धतीने वेतन अदा करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली.