काेट
आषाढ महिना हा अमावस्यापासून सुरू हाेताे. साधारणत: ११ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत आषाढ महिना आहे. १५ जुलैपासून चातुर्मास सुरू झाला आहे. त्यामुळे नाेव्हेंबरपर्यंत विवाहाचे मुहूर्त नाही. मात्र ज्यांना विवाह करणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी आपत्कालीन मुहूर्त पाहावे लागतात. काेराेनामुळे अनेकांनी लग्नकार्य पुढे ढकलले. आता प्रेम विवाह व काेर्ट मॅरेज करणाऱ्यांची संख्या वाढत असून अशांची लग्न आपण मार्कंडा येथील मंदिरात करून देत आहाेत. मुहूर्त पाहून लग्न करणारे लाेक आषाढ महिन्यात शक्यताे विवाह करीत नाही.
- श्रीकांत पांडे, महाराज, मार्कंडेश्वर देवस्थान
काेराेनामुळे प्रशासनाने नियम लागू केले. प्रादुर्भाव कमी झाला तरी सार्वजनिक कार्यक्रमांबाबत निर्बंध कायम आहेत. पंचांगनुसार विवाहाच्या तारखा सांगताे. काेराेनामुळे परिस्थिती बदलली असून परिस्थितीनुसार लग्नकार्य करणारे कुटुंब निर्णय घेत आहेत.
- माणिक बांगरे, महाराज, गडचिराेली
परवानगी ५० चीच पण
गडचिराेली जिल्ह्यात विवाहकार्य किंवा साेहळ्याला ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची प्रशासनाकडून परवानगी आहे. मंगल कार्यालये बुक करताना संचालक याची माहिती संबंधित कुटुंबांना देतात. असे असले तरी ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी व आप्तेष्ट उपस्थित राहत असल्याचे दिसून येते.
मंगल कार्यालयाकडे पाठ
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कुटुंब आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी सर्व साेयीयुक्त लहान मंगल कार्यालय बुक करण्यावर भर देत आहेत. मात्र सर्वसामान्य कुटुंब ५० व्यक्तीच्या उपस्थितीत आपल्याच घरच्या अंगणात विवाह साेहळा पार पाडण्यास पसंती देत आहेत.
अलिकडेच गडचिराेली शहरात काही विवाहकार्य पार पडले. लाेकांच्या उपस्थिती मर्यादेमुळे काही कुटुंबांनी टप्प्याटप्प्याने वेळ देऊन आप्तेष्ट बाेलविल्याची माहिती आहे.