गडचिराेली : भाेजनातील चमचमीत, चवदार व स्वादिष्ट भाजी हाेण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र काेराेना लाॅकडाऊनपासून मसाल्याच्या पदार्थांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. आता काेराेना संसर्गामुळे नागपूर शहरात कडक धाेरण अवलंबिले जात असल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. परिणामी मसाले व खाद्य पदार्थांच्या भावात वाढ झाली आहे.
गडचिराेली शहरातील बाजारपेठेत लाल मिरची व मसाल्याच्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. गेल्या दाेन ते तीन महिन्यांत विविध पदार्थांचे ५ ते १० टक्क्यांनी दर वाढले आहेत. भाववाढ झाल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. गडचिराेली शहरात लाल मिरची प्रामुख्याने कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा, नागपूरनजीकच्या भिवापूर तसेच सिराेंचा शहरातूनही आयात हाेत असते. सध्या मिरचीचे भाव प्रचंड वधारले आहेत.
काेट
काेराेना महामारीची समस्या निर्माण हाेण्यापूर्वी मसाले पदार्थाचे भाव कमी हाेते. मात्र पहिल्या लाॅकडाऊनपासून मसाल्याचे दर वाढले. आता पुन्हा नागपूर शहरात लाॅकडाऊन कडक असल्याने मसाल्याच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माल मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना अधिक भाव द्यावा लागत आहे.
- शरद चापले, व्यापारी
केंद्र व राज्य सरकारचे खाद्य वस्तूंच्या दरावर मुळीच नियंत्रण नाही. पूर्वीच्या तुलनेत आता १५ ते २० टक्के भाव वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसविताना कसरत करावी लागते. मांसाहारी भाेजनासह बरेच पदार्थ बनविण्यासाठी मसाल्यांचा वापर करावा लागताे. मात्र भाव वाढल्याने त्रास हाेतो.
- संगीता लाेनबले, गृहिणी
काेराेना महामारीच्या लाॅकडाऊनपूर्वी खाद्य पदार्थ व मसाले पदार्थांचे भाव नियंत्रणात हाेते. मात्र आता २०० ते ५०० रुपयांच्या मसाल्यामध्ये ५०० लाेकांचे भाेजन तयार हाेऊ शकत नाही. मसाल्याच्या भावांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वसामान्य गृहिणींना घाम फुटत आहे.
- रंजना पिपरे, गृहिणी