बाॅक्स
केवळ हिंदी व इंग्रजीतच ॲपची माहिती
मेरा रेशन या ॲपवर केवळ इंग्रजी व हिंदी या दाेनच भाषा उपलब्ध आहेत. रेशनचे धान्य उचलणारे कुटुंब कमी शिकलेले राहतात. त्यांना केवळ मातृभाषाच समजते. भारतात अनेक भाषा बाेलल्या जातात. त्यापैकी काही भाषांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या स्थानिक भाषांमध्ये हे ॲप असणे आवश्यक आहे. तसेच हे ॲप दाेन ते तीनवेळा प्रयत्न केल्यानंतरच उघडते. हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याची गरज आहे.
बाॅक्स
तक्रारही नाेंदविता येणार
या ॲपमध्ये एफपीएस फिडबॅक नावाचे एक ऑप्शन उपलब्ध आहे. यात संबंधित रेशन दुकानदाराची काही तक्रार असल्यास या ॲपवर तक्रार नाेंदविता येणार आहे. दुकानाचा नंबर व माेबाईल नंबर टाकावा लागते.
बाॅक्स
क्लिकवर मिळणार ही माहिती
लाभार्थ्यांना मिळणारे धान्य, जवळपास असलेले रास्त भाव दुकान, शिधापत्रिकेवर उचललेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र, लाभार्थ्याला मिळणारे धान्य आदी माहिती या ॲपवर उपलब्ध हाेते.
२,२६,५८८
एकूण रेशन कार्ड
३१,२००
बीपीएल कार्ड
९२,१३४
अंत्याेदय
६७,६७९
अन्नसुरक्षा