एकात्मिक बाल विकास प्रकल्प चामोर्शी अंतर्गत राष्ट्रीय पोषण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. सदस्य दीपाली बोदलकर, पुंडलिक भांडेकर, मधुकर टिकले, आरोग्य सेविका बी. एन. बावणे, आरोग्य सेविका ए. एस. बायस्कर, जिन्नत सय्यद आदी उपस्थित होते.
गरोदर माता व बालकांनी स्वतःचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी रोजच्या आहारात सकस अन्न व पदार्थाचे सेवन करावे, आहारात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा समावेश करावा पोषणाकडे दुर्लक्ष न करता शारीरिक व बौद्धिक विकासासाठी आहार घेणे गरजेचे आहे, असेही सरपंच अल्का धोडरे यांनी मार्गदर्शन केले. संचालन योगिता वासेकर यांनी केले तर आभार मंदा चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी करण्यासाठी सुमित्रा पिपरे, निर्मला भांडेकर, शकुंतला देवतळे, शोभा वासेकर आदींनी सहकार्य केले.
030921\img-20210903-wa0075.jpg
पोषण अभियान मार्गदर्शन फोटो