लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार व कामधंदे बंद पडले आहेत. जिल्हाभरातील शाळाही बंद आहेत. अशा स्थितीत शाळांमध्ये शिल्लक असलेला शालेय पोषण आहार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना वितरीत केला जात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या धान्याचे वितरण करण्यात आले.घोट - येथील नवोदय उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शाळा व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळ विद्यार्थांना वितरीत करण्याकरिता निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने घोट येथील नवोदय उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका विजयश्री अगडे यांच्या हस्ते धान्य वितरीत करण्यात आले. यावेळी शिक्षक शांताराम कुनघाडकर, शुभा भसारकर उपस्थित होते.रांगी - येथील जि. प. उच्च प्रा. केंद्र शाळेत ३ एप्रिल रोजी शाळास्तरावर शिल्लक असलेले तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रांगेत १ मीटर अंतरावर उभे करून अन्न धान्याच्या शिलकी उपल्ब्धतेनुसार सम प्रमाणात धान्य वितरीत करण्यात आले. आजारी विद्यार्थ्यांना घरपोच धान्य देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक महेंद्र कुकडकर, विषय शिक्षक हेमंत काटेंगे, एन. जांगी, नारायण परशुरामकर, पालक अरुण चापळे, सुनीता भुरसे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कोरेगाव/चोप - चोप येथील जि.प. प्राथमिक कन्या शाळेत सर्व विद्यार्थिनींना शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, धान्य वाटपात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले.शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनींना २ किलो तांदूळ, मूगडाळ, मसुरडाळ ५०० ग्रॅम आणि सोयाबीन तेल ३०० गॅ्रम याप्रमाणात देण्यात आले. विशेष म्हणजे सर्व साहित्य पॅकिंग करून वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी ठाकरे, उपाध्यक्ष वैशाली मासुरकर,सदस्य मेघनाथ इंदुरकर, विठ्ठल वासनिक, भाऊराव उईके, विशाखा वालदे, सरीता दुपारे, देवांगणा मडावी, शबाना सय्यद, मुख्याध्यापक विठ्ठल दहिकर सुरेखा बन्सोड, प्रगती धाईत, छाया कुथे, सचिन लांजेवार उपस्थित होते.सामाजिक दुरीकरणावर भरसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळांमध्ये शिल्लक पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप केले जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने वितरणप्रसंगी विद्यार्थी व पालकांची एकत्रित गर्दी होऊ नये, यासाठी शाळांमध्येही सामाजिक दुरीकरण ठेवले जात आहे.
प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना मिळताहे पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM
घोट - येथील नवोदय उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शाळा व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळ विद्यार्थांना वितरीत करण्याकरिता निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने घोट येथील नवोदय उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका विजयश्री अगडे यांच्या हस्ते धान्य वितरीत करण्यात आले. यावेळी शिक्षक शांताराम कुनघाडकर, शुभा भसारकर उपस्थित होते.
ठळक मुद्देघोट, रांगी, चोप, भाकरोंडी येथे तांदूळ व डाळींचे वितरण ; दिव्यांग विद्यार्थ्यांना घरपोच दिला लाभ