शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नोकरभरतीमधील बंदीत ओबीसी व इतर समाजाची होतेय दिशाभूल

By admin | Published: July 14, 2017 2:08 AM

जिल्ह्यात पेसा कायद्यांतर्गत वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत एसटी वगळता ओबीसी, एससी व इतर गैरआदिवासी

नारायण जांभुळे : गैरआदिवासींवरील अन्याय दूर करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात पेसा कायद्यांतर्गत वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत एसटी वगळता ओबीसी, एससी व इतर गैरआदिवासी समाजाची भरती करण्यावर २०१३ पासून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गैरआदिवासी समाजासाठी अन्यायकारक असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी ती बंदी उठविण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता केवळ दिशाभूल करीत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी अ‍ॅड.नारायण जांभुळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.यासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. जांभुळे यांनी सांगितले, एसटी प्रवर्गाशिवाय इतर प्रवर्गातील नोकरभरतीवर बंदी घालणारी अधिसूचना राज्याच्या आदिवासी आमदारांच्या सल्लागार समितीने घेतलेल्या ठरावानुसार जारी करण्यात आली आहे. त्यामुळे ही बंदी मागे घेण्याचा आधिकारसुद्धा याच समितीला आहे. आदिवासी राखीव क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे सर्व आदिवासी आमदार या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. दर सहा महिन्यांनी या समितीची बैठक होते. पण सदर नोकरभरती उठविण्याचा ठराव जिल्ह्यातील कोणत्याही आदिवासी आमदाराने या समितीच्या बैठकीत मांडला नाही. मात्र दुसरीकडे राज्यपालांकडे ही बंदी उठविण्याची मागणी करून ते नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप जांभुळे यांनी केला.आधीच जिल्ह्यात गैरआदिवासी समाजाचे आरक्षण १९ टक्क्यांवरून आधी १३ टक्के आणि नंतर ६ टक्क्यांवर आणून तमाम ओबीसी, एससी, एनटी, ओपन या समाजावर अन्याय झाला आहे. हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात करावे, अशी मागणी त्यांनी केली.सध्या लॉयड्स कंपनीला खननासाठी दिलेल्या सूरजागडच्या पहाडीवर जुना किल्ला आहे. त्यांची परवानगी रद्द करून हा परिसर ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करावा अशी मागणी त्यांनी केली. लॉयड्सच्या प्रकल्पासाठी कोणतेही नोटीफिकेशन न काढताच मुख्यमंत्र्यांच्या हातून घाईगडबडीत भूमिपूजन उरकून प्रकल्पाचा विरोध संपविल्याचे ते म्हणाले.३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.