शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

खरेदी-विक्री व बांधकामावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 8:58 PM

नगरपालिकेच्या विकासकामांबाबतची आमसभा मंगळवारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व अनेक विकास कामे या मुद्यावर ही आमसभा चांगलीच गाजली.

ठळक मुद्देपालिकेच्या सभेत गाजला मुद्दा : आमसभेत अनेक ठराव फेटाळले; विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांचाही विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगरपालिकेच्या विकासकामांबाबतची आमसभा मंगळवारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व अनेक विकास कामे या मुद्यावर ही आमसभा चांगलीच गाजली.विशेष म्हणजे ठरावांना विरोधकांसोबत सत्ताधारीही विरोध करीत असल्याचे अजब चित्र दिसले. नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आमसभेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, मुध्याधिकारी कृष्णा निपाने तसेच सर्व नगरसेवक, पालिकेचे विभागप्रमुख उपस्थित होते.शहराच्या विकासात्मक कामाबाबतचा ठराव घेऊन सर्वानुमते पारित करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अनेक प्रस्ताव नगरसेवकांना विश्वासात न घेता करण्यात आले आहेत, असा आरोप करीत अनेक ठराव पुढील आमसभेत ढकलण्यात आले. नागरिकांमधून शहराच्या विकासात्मक कामाबाबत ओरड सुरू आहे. नागरिकांचा आरोप आहे की, शहराचा विकास कासवगतीने करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांना वेग देण्याकरिता आमसभेकडे पाहिले जात होते. मात्र या आमसभेत नगरसेवकांनी अनेक ठराव फेटाळून लावले. त्यामुळे या विकास कामांना वेग न येता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वात्सविक या आमसभेत विरोधी पक्षाचे दोन नगरसेवक सोडले तर सर्वच नगरसेवक सत्ताधारी भाजप पक्षाचे आहेत. तसेच नगराध्यक्ष व सभापतीदेखील भाजपाचे आहेत. त्यामुळे कोणताही प्रस्ताव सर्वानुमते पारित होण्यास कोणतीही अडचण सभागृहाला नसावी. मात्र मंगळवारच्या आमसभेत विपरित चित्र पहावयास मिळाले. थेट विरोधी नगसेवकांनासह सत्ताधारी नगरसेवकांनीदेखील ठरावाला विरोध केला.मंगळवारी झालेल्या नगर परिषदेची आमसभा चांगलीच गदारोळात पार पडली. आमसभेमार्फत ठराव पारित करून करण्यात आलेल्या विकास कामांवर खिळ बसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक खरेदी-विक्रीचे तसेच बांधकामाची कामे परस्पर करण्यात येत असल्याचेही सत्ताधारी नगरसेवकांनी आमसभेत मांडले. यापुढे सर्व प्रस्तावांची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात यावी, अशी विनंती देखील सर्व नगरसेवकांनी अध्यक्षांना केली. या आमसभेत बराच वेळ गदारोळ दिसून आला.पालिकेच्या कारभाराबाबत नाराजीचा सूरगडचिरोली नगर पालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्त्ता आली. या पालिकेत तीन स्वीकृत सदस्य भाजपाचे आहेत. केवळ एक नगरसेवक काँग्रेस व एक नगरसेवक रासपचा आहे. २५ पैकी २३ नगरसेवक भाजपचे आहेत. अशा परिस्थितीत शहरातील विकास कामांना व विकासाच्या नियोजनाला गती मिळण्याची अपेक्षा गडचिरोलीकरांनी निवडणुकीनंतर केली होती. मात्र शहरात विकास कामाला गती दिसून येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकासह सत्ताधारी नगरसेवकांकडूनही पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.