लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंधारण व गंगाशुध्दीकरण मंत्री नितीन गडकरी हे गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभानिमित्त गडचिरोली शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन तेथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.डेवीड बोगी व फैजान खान पठाण या दोन पदाधिकाऱ्यांचे ना. नितीन गडकरी यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, बाबुराव कोहळे, अरविंद पोरेड्डीवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, शालू दंडवते, रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:42 IST
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंधारण व गंगाशुध्दीकरण मंत्री नितीन गडकरी हे गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभानिमित्त गडचिरोली शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन तेथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.डेवीड ...
पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
ठळक मुद्देकार्यकर्त्यांशी साधला संवाद : नितीन गडकरी यांनी केले स्वागत