लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन या बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, आधूनिक तंत्रज्ञान यांची माहिती जाणून घेतली.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, संचालक दिलीपराव मोहिते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, आय.टी. विभागाचे प्रमुख सुधीर पाठवळे, संदीप घारे यांनी भेट दिली.यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे जिल्ह्यात एकुण २८६ शाखा कार्यरत आहेत. बँकेचा एकुण व्यवसाय १७ हजार कोटी रूपये आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दुर्गम भागात असतांनासुद्धा बँकेने स्किारलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रशंसा केली.गडचिरोली जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, पुणेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या पदाधिकाºयांनी भेट देऊन गडचिरोली बँकेच्या कार्याची प्रशंसा केली ही अतिशय मोठी बाब आहे. बँकांमध्ये वाढलेल्या स्पर्धेत सहकारी बँकांना टिकवून ठेवायचे असेल तर माहितीची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार, संचालन व आभार मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी केले.कार्यक्रमाला बँकेचे व्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, एस. एम. अलमपटलावार, जी. के. नरड, आर. वाय. सोरते, उपव्यवस्थापक पी. आर. पुणेकर, एच. के. भडके आदी अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणले गडचिरोली बँकेचे तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:49 PM
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन या बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, आधूनिक तंत्रज्ञान यांची माहिती जाणून घेतली.
ठळक मुद्देमुख्यालयाला भेट : दुर्गम भागातील बँकेच्या विस्तारकार्याची केली प्रशंसा