लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वर्षभरात करावयाच्या कामात पावसाळ्यापूर्वी कार्यालय व कार्यालयीन परिसराची स्वच्छता करणे, हा एक नियोजनाचा भाग आहे. यानुसार देसाईगंज पं. स. ने कार्यालय व परिसराची स्वच्छता ८ जून रोजी केली. ‘एक दिवस स्वच्छतेचा’ या अनोख्या उपक्रमात कार्यालयीन अधिकारी, विस्तार अधिकारी, लिपीक व परिचरांनी सहभाग घेतला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विविध कामांवर परिणाम झाला आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संकटातही सर्व कामे ठप्प न पाडता ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक परिसर स्वच्छतेला देखील विशेष महत्त्व आहे.‘एक दिवस स्वच्छतेचा’ हा उपक्रम सुद्धा उल्लेखनीय असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसर स्वच्छ करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी श्रावण सलाम, कृषी अधिकारी एस. ए. थोटे, शाखा अभियंता एन. झेड. मोटघरे, वाय. के. निनावे, सहाय्यक प्रशासन अधिकारी पी. एस. सिडाम, विस्तार अधिकारी (सांखिकी) जे. टी. राठोड, यांत्रिकी प्रमुख एम. जी. बगमारे यांच्यासह पंचायत समितीतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.कर्मचाऱ्यांनीच केले कार्यालय सॅनिटराईजकारोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निर्जंतुकीकरणाला वेग आला होता. या पार्श्वभूमीवर कार्यालय व कार्यालयीन परिसराची स्वच्छता करणे, हा एक स्तुत्य उपक्रम ठरत आहे. मागील आठवड्यात देसाईगंज पं. स. ने कार्यालयाचे अंतरंग व बाह्यांग पूर्णपणे सॅनिटराईज केले होते. यासाठी मजूर न लावता संवर्ग विकास अधिकारी आणि कर्मचाºयांनी स्वत: काम केले. उल्लेखनीय कामांबाबत देसाईगंज पंचायत समितीला आजवर अनेकदा पुरस्कृत करण्यात आले आहे.
स्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचारी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 5:00 AM
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विविध कामांवर परिणाम झाला आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संकटातही सर्व कामे ठप्प न पाडता ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक परिसर स्वच्छतेला देखील विशेष महत्त्व आहे.
ठळक मुद्देकार्यालय व परिसर केला स्वच्छ : देसाईगंज पंचायत समितीतर्फे ‘एक दिवस स्वच्छतेचा’ उपक्रम