शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

अधिकाऱ्यांनी पाळला लक्षवेध दिन

By admin | Published: July 13, 2016 2:15 AM

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊनही निर्णय झाले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा पुढाकार गडचिरोली : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊनही निर्णय झाले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने लक्षवेध दिन पाळण्यात आला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन सादर केले. सातवा वेतन आयोग योग्य सुधारणांसह राज्यात विनाविलंब लागू करावा, वेतन आयोग लागू करण्यापूर्वी समानता निश्चित करून विद्यमान वेतनातील त्रूटी दूर कराव्यात, केंद्रांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, जुनी पेंशन योजना व नवीन पेंशन योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय उपलब्ध असावा, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचे बाल संगोपन रजा मंजूर करावी, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाण ६० वर्ष करावे, सेवाअंतर्गत आश्वासित प्रगत योजनेतील ५ हजार ४०० च्या ग्रेड पेची मर्यादा काढून घ्यावी, प्रशंसनीय कामाबद्दल १ जानेवारी २०१६ पासून आगाऊ वेतनवाढ लागू करावी, मानीव विलंबन कार्यपद्धती बंद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, भूसंपादन अधिकारी मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, डॉ. प्रशांत आखाडे, बीडीओ शालिक पडघन, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीरामे, समाजकल्याण अधिकारी मोहतुरे, डॉ. शिरीष रामटेके, डॉ. शशिकांत शंभरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. विनोद बिटपल्लीवार, डॉ. किशोर वाघ, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. श्रद्धा वासनिक, डॉ. हेमंतकुमार कोवाची, डॉ. प्रदीप रणवरे, डॉ. अरविंद रेहपाडे, डॉ. मो. आरिफ उपस्थित होते.