लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आधारभूत धान खरेदी योंजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चुकारे देण्यास का विलंब होत आहे, असा जाब तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलेश सोरफडे व निरिक्षक के. आर. पंधरे यांना विचारला आहे.उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत कुरखेडा, वडेगाव, आंधळी, गेवर्धा, देऊळगाव, पलसगड, गोठणगाव, सोनसरी, घाटी, कढोली या १० ठिकाणी धान केली जात आहे. यावर्षी खुल्या बाजारपेठेत धानाला अपेक्षित भाव नसल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली जात आहे. खरेदी झाल्यानंतर तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतील, असे आश्वासन प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अनेक शेतकऱ्यांचे चुकारेच झाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. धानाची उचल अत्यंत संथगतीने होत असल्याने केंद्रावरच धान पडला आहे.कधीकधी अधिकचे धान्य वसूल केली जाते. याची चौकशी करावी, अशी मागणी उपप्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, पं.स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, आनंदराव जांभुळकर, नगरसेवक उसमान खान, कपील पेंदाम, विजय भैसारे, रवी मेश्राम, रोहित ढवळे, हिरामन सोनकुसरे, मनोहर मेश्राम, मनोहर राऊत आदी उपस्थित होते.
चुकाऱ्यांच्या विलंबाबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:20 PM
आधारभूत धान खरेदी योंजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चुकारे देण्यास का विलंब होत आहे, असा जाब तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलेश सोरफडे व निरिक्षक के. आर. पंधरे यांना विचारला आहे.
ठळक मुद्देउपप्रादेशिक व्यवस्थापकांची भेट : दोन महिन्यांपासून चुकारे नाही