गडचिराेली : राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना अमलात आणली आहे. मात्र अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना या योजनेपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ पेन्शन योजना, विधवा, दिव्यांग आणि केंद्र शासन पुरस्कृत कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यातील जवळपास दीड लाख महिलांना ‘लाडकी बहिण’ याेजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, सरकारने आम्हा बहिणींसाठी याेजना तर आणली मात्र अटीशर्ती घातल्या, काय गं नशीब मेलं, असा सूर महिलांचा सूर आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या याेजनेंसंदर्भात १ जुलैपासून दर दाेन-दाेन तासांनी शासनाच्या अटी, शर्ती व नियमांमध्ये बदल हाेत घाेषणा केली जात आहे. गरीब व गरजू महिलांना या याेजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाने गेल्या दाेन दिवसांत तातडीच्या बैठका घेउन भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, ही याेजना अंमलात आल्यापासून शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या हालचाली गतीने वाढल्या आहेत.
यंत्रणेच्या वतीने ३ जुलै राेजी गुरूवारला सदर याेजनेबाबत महिला व नागरिकांमध्ये असलेले सर्व गैरसमज दूर करण्यात आले. शासनाच्या काेणत्याही याेजनेतून महिन्याला मिळत असलेले एकूण अर्थसहाय्य दीड हजार रूपयांपर्यंत असेल तर संबंधित लाभार्थी महिलेला ‘लाडकी बहिण’ याेजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे लाभाचा अद्यावत निकष
शासनाच्या एका याेजनेतून ५००, दुसऱ्या याेजनेतून ७०० असे एकूण १ हजार २०० रूपये यापूर्वीच मिळत असल्यास संबंधित लाभार्थी महिलेला ‘लाडकी बहिण’ याेजनेतून केवळ ३०० रूपये मिळणार आहेत. एकूणच महाराष्ट्र राज्यातील काेणत्याही महिलेला सरकारकडून मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्याची मर्यादा दीड हजार रूपये निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक अर्थसहाय काेणत्या महिलेला मिळणार नाही. एकुणच सर्व याेजना मिळून एका महिलेला प्रति महीना दीड हजार रूपयांपर्यंतचे अर्थसहाय शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.
पीएम किसान सन्मान याेजनेचे लाभार्थी बादकेंद्र सरकारच्या पीएम किसान याेजनेंतर्गत सहा महिन्याला दाेन टप्प्यात सहा हजार रूपये लाभार्थ्यांना दिले जातात. या याेजनेतून वर्षाला १२ हजार रूपयांचे अर्थसहाय्य जिल्ह्यातील हजाराे महिलांना मिळत आहे. या याेजनेत प्रति महिना एक हजार रूपये मिळत आहे. तसेच राज्यशासनाच्या नमाे शेतकरी महा सन्मान याेजनेतून केंद्र सरकारप्रमाणेच वर्षाला १२ हजार रूपयाचे अर्थसहाय दिले जात आहे. या दाेन्ही याेजनेचे लाभार्थी महिला लाडकी बहीण याेजनेतून बाद हाेणार आहेत.
शासनाच्या काेणत्याही याेजनेतून महिन्याला मिळत असलेले एकूण अर्थसहाय्य दीड हजार रूपयांपर्यंत असेल तर संबंधित लाभार्थी महिलेला ‘लाडकी बहिण’ याेजनेचा लाभ मिळणार नाही. जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी घेतलेल्या बैठकीत सदर याेजनेच्या निकषाबाबत माहीती देण्यात आली. आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. दीड हजार रूपयांपर्यंचे मासिक अर्थसहाय मिळत असलेल्या महिला सदर नव्या याेजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील. - हेमंत माेहरे, तहसीलदार, गडचिराेली.