लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोनाच्या संचारबंदीने गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर परजिल्ह्यात व परराज्यात अडकले आहेत. काम संपले, हातातील पैसा संपला, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न अनेक मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. अशातच काही कुटुंब पायी प्रवास करून परजिल्ह्यातील आपले स्वत:चे गाव गाठत असल्याचे दिसून येत आहे.असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे, असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजुरा परिसरातून १५० किमीचा पायी प्रवास करून काही मजूर भेंडाळा परिसरात स्व:गावी पोहोचले. दोन दिवसांपूर्वी निघालेले हे मजूर पायी प्रवास करून सोमवारी सकाळी भेंडाळा गावात पोहोचले. मिरची तोडण्याचे काम पूर्ण झाले. तसेच तेथे निवास व अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. गावाकडे परतण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीत पायीच प्रवास करून स्वत:चे गाव गाठायचे, असा निर्णय घेतला. डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन मुख्य मार्गाने मजूर चामोर्शी तालुक्यात पोहोचले. दरम्यान पायी प्रवास केलेले हे मजूर प्रचंड थकल्याचे दिसले. मात्र स्वत:च्या गावी पोहोचल्याचे वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. अशा प्रकारे पायी प्रवास करून गावाकडे परतणाऱ्या मजुरांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. कोरोनाच्या संकटामुळे रोजगारासाठी गेलेल्या मजुरांची फजिती होत आहे.
दीडशे किमीचा पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:00 AM
असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे, असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजुरा परिसरातून १५० किमीचा पायी प्रवास करून काही मजूर भेंडाळा परिसरात स्व:गावी पोहोचले.
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा परिसरातून गाठले भेंडाळा